कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील (Riya Patil) हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब जिंकला आहे. यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियातर्फे या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात आला.
आसाममधील गुवाहाटी शहरातील डॉ. झाकीर हुसेन अँकवेटिक कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 25 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. देशभरातून एकूण 450 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे 55 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या पूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघांने 428 गुण मिळवून चॅम्पियनशिप ट्रॉफी आपल्या नावावर केली.
या स्पर्धेत महाराष्ट्राचा ऑलिम्पिक खेळाडू सुयश जाधव तसेच स्वप्निल पाटील, दीपक पाटील, आफ्रिदी, अभिषेक यांच्या उत्कृष्ट खेळामुळे तर मुलींमध्ये कांचन चौधरी, वैष्णवी जगताप ,शश्रुती नाकाडे, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, तृप्ती व नाशिकच्या सिद्धी व गौरी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत सब ज्युनिअर गर्ल्समध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने सुवर्ण कामगिरी केली. रिया पाटील (Riya Patil) ही या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू होती. तिने 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 12 सेकंदाची कामगिरी नोंदवली. तर 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनिटे 57 सेकंदाची कामगिरी नोंदवली. या दोन्ही प्रकारात रियाने नव्या रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले. तसेच रियाने (Riya Patil) 50 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतही तिने सुर्वणपदक जिंकले. यामुळे तिने या स्पर्धेत एकूण ३ सुर्वणपदक जिंकले. या स्पर्धेत रिया पाटील हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूची ट्रॉफी देऊन तिला गौरवण्यात आले.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!