सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी परिसरास आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच साचला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे पर्यटकांची एकच धांदल उडाली. या गारांच्या पावसाचा व्यापा-यांसह शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसाळा सुरुवात झाली.
https://www.facebook.com/watch/?v=747010370306966&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing
यावेळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गाराही बरसल्या. गारपिटीने स्ट्रॉबेरी पिकांची मोठ्या प्रमाणत नुकसानी झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये अशा पद्धतीने गारांचा खच दिसून आला. गारांच्या पावसामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव आला.