नगराध्यक्षांविरोधात नगरसेवकाचे अर्धनग्न आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विकास कामांना व स्वच्छतेला खीळ घालण्याचे काम माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत हे करीत असून त्यांच्या विरोधात नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी मुंडन करत, अर्धनग्न होऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. जत नगर परिषदेच्या वतीने कचरा उचलण्यासाठी ठेका देण्यात आला होता. त्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर तो ठेका रद्द करावा म्हणून उमेश सामंत यांनी अर्ज दाखल केले होते.

मुदत संपलेल्या ठेका रद्द करून नवीन कचरा उचलण्यासाठी नवा ठेका काढावा अशी मागणी केली होती. नवीन काढण्यात आलेला ठेका ही रद्द करावा, म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेश सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन्ही ठेके नसल्यामुळे जत शहरात घाणीचे साम्राज्य पसरू नये म्हणून जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. उमेश सावत यांनी कचऱ्याचा ठेका मिळावा, म्हणून त्यांनी ठाणे येथील सारथी एंटरप्राइजेस या नावाने त्यांनी ठेका भरता होता. कागदपत्र अपुरे असल्यामुळे तो ठेका रद्द करण्यात आला.

ठेका मिळाला नाही म्हणून उमेश सावंत यांना पोटशूळ उठल्यामुळे जत शहरवासीय घाणीच्या साम्राज्यात अडकून पडावे, यासाठी त्यांना नवीन काढलेल्या कचऱ्याच्या ठेकेला पण विरोध केला आहे. आज पर्यंत उमेश सावत यांनी अधिकारी यांना दमदाटी करणे कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हा दाखल करणे असा उद्योग त्यांनी केला आहे. जत शहराच्या विकासाला खीळ घालणारी प्रवृत्ती त्यांचे असून त्यामुळे त्यांनी हा डाव आखला आहे. यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

Leave a Comment