“अर्थसंकल्पातून पळसूत्री सरकारकडून विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न”; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असून पळसूत्री सरकारने विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळे फसण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आमच्याच योजना या सरकारने पुन्हा सुरु केल्या आहरेत. पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्गपासून मेट्रोपासून बुलेट ट्रेनला विरोध केला आणि आता पुन्हा घोषणा करत आहे. त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711

शेतकऱ्यासाठी करण्यात आलेली दोन वर्षापूर्वीची घोषणा आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता या पळपुटे सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतआहे? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment