राज्यात CNG स्वस्त होणार; पेट्रोल-डिझेलवरील करात मात्र कपात नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यावेळी सरकार कडून सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल वरील करामध्ये मात्र कोणतीही कपात केली जाणार नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1124531655008127

नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढावा. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका केला आहे. असे अजित पावर यांनी सांगितले. दरम्यान यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711

दरम्यान , राज्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. त्यामुळे २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Comment