औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात यावी. तर परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी. पी.एस.आय परीक्षा संयुक्तीक परीक्षे सोबत नघेता स्वतंत्र स्वरूपात घ्यावी. वेळापत्रकात जेवढ्या जागांची भरती निघणार आहे. त्या जागांचा आकडा जाहीर करण्यात यावा. पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. तसेच उत्पादन शुल्कच्या जागांची संख्या वाढवण्यात यावी या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांची माहिती वेगवेगळ्या पोर्टलवर पाहवी लागते. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने एकाच पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा पर्याय म्हणून महापोर्टल सुरु करण्यात आले आहे.