खळबळजनक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना सापडले हँड ग्रेनेड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबतची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी हँड ग्रेनेड आपल्या ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडला. ज्यामुळे आता नागरिकांच्यामनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाणेरमध्ये मेट्रोचे खोदकाम सुरू असताना दोन जिवंत हॅन्डग्रेनेड बॉम्ब सापडल्याचे आढळून आले. यानंतर मेट्रो कामगारांनी तातडीने बॉम्ब पथकला आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी आल्यानंतर बॉम्ब पथकाने हे दोन्ही हॅन्डग्रेनेड बॉम्ब ताब्यात घेतले. अद्याप हे हॅन्डग्रेनेड बॉम्ब याठिकाणी कसे आले हे समोर आलेले नाही. त्यामुळे सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहे.

दरम्यान, आज बाणेर परिसराच्या आयशर कंपनीच्या आवारात मेट्रोसाठी खोदकाम करण्यात येत होते. याचवेळी कामगारांना दोन हॅन्डग्रेनेड बॉम्ब सापडले. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. तसेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने येऊन हे हॅन्ड ग्रेनेड आपल्या ताब्यात घेतले. आता पोलीस हे हॅन्ड ग्रेनेड याठिकाणी कसे आले याबाबतचा तपास करीत आहेत.