पुणे प्रतिनिधी | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण झालेलं असताना गरीब कष्टकरी जनतेचे होणारे हाल प्रचंड आहेत. हातावरचं पोट असणाऱ्या नागरिकांनी लॉकडाऊनचे पहिले २ टप्पे कसेबसे काढले, मात्र त्यानंतर या वर्गाची होणारी फरफटही संपूर्ण देशाने पाहिली. कष्टकरी मजुरांचे तांडे रस्त्याने चालत जात असताना पाहणं हे वेदनादायी होती. अनेक लोकांच्या वेदना आपल्याला दिसून आल्या, मात्र देशातील बरीच जनता अशी सुद्धा आहे ज्यांच्यापर्यंत लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरू झाला तरी अद्यापही मदतीचा हात पोहचला नाही. पुण्यातील गुलटेकडी परिसरातील खंदारे वस्तीत राहणारे संजय राजू काळे हे त्यातीलच एक.
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणारे दिव्यांग रिक्षाचालक संजय राजू काळे यांना तात्काळ मदतीची गरज आहे. लॉकडाऊन काळात काम नसल्याने त्यांच्या शारीरिक व्याधीही वाढल्या आहेत. मदतीसाठी संपर्क – 8888388319 (गुगल पे आहे.) @sarang_punekar @AjitPawarSpeaks @GirishBapatBJ pic.twitter.com/rvF9WLieVd
— Yogesh Nanda Somnath (@yogeshsjagtap) June 2, 2020
संजय काळे हे एका पायाने अधू असून ते पुण्यातच रिक्षा चालवतात. २०१५ पासून त्यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. घरी बसून बसून त्यांचे पाय आखडले असून याचा अधिक त्रास त्यांना होत आहे. लॉकडाऊन काळात कमाईसाठी कोणतंच साधन उपलब्ध नसल्याने आणि जवळील सेवाभावी संस्थांमार्फतही कोणतीच मदत न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत. काळे हे आपल्या आईसोबत एका छोट्या खोलीमध्ये राहत आहेत. ते राहत असलेला एरिया कधी रेड झोन तर कधी प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. समाजातील संवेदनशील नागरिकांकडून त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक मदत किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मदत आपण काळे यांना करु शकता.
मदतीसाठी संपर्क – संजय राजू काळे – 8888388319 (गुगल पे उपलब्ध आहे.)
बँक ऑफ महाराष्ट्र, गुलटेकडी शाखा, पुणे
बचत खाते अकाउंट नंबर – 60130910548
ifsc code – MAHB0000320