हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या करोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगात करोनाने थैमान घातलं आहे. अनेक देश ठप्प पडले आहेत. लोक घरात कोंडली गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून माणूस माणसापासूनच लांब पळत आहे. करोनामुळे जगभरामध्ये आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ८० हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. अशा वैश्विक संकटाच्या परिस्थितीत चीनमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमधील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर करोनाप्रमाणे हंतानेही महामारीचे स्वरुप धारण करु नये अशी भीती सोशल मिडियावर व्यक्त करण्यात येत आहे.
चीनच्या शाडोंग प्रांतांमधून कामावरुन परत येताना बसमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तपासणीत या व्यक्तीचा हंता व्हायरसने मृत्यू झाल्याचे कळताच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तांनंतर काळजीपोटी हंता व्हायरसबद्दल सर्च करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हंताबद्दल अनेकांनी इंटरनेटवर शोध घ्यायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
तज्ज्ञांच्या मते हंता व्हायरस करोनाइतका घातक व्हायरस नाही आहे. हंता व्हायरस करोनाप्रमाणे संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हंता व्हायरस पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार,”घरामध्ये उंदीर असतील तर हंता विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अगदी ठणठणीत व्यक्तीही उंदरांच्या संपर्कात आल्यास त्याला हंता विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.”
करोनाप्रमाणे हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो. हंताचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत. उपचार करण्यास उशीर झाल तर हंतामुळे फुफुसांमध्ये पाणी साचतं. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सीडीसीच्या माहितीनुसार हंताची लागण झालेल्यांचा मृत्यूदर ३८ टक्के इतका आहे. चीनमधून जगभऱात पसलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यादाच हंतामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने जगभरातील नेटकऱ्यांनी सोशल मिडियावरुन चिंता व्यक्त केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?