सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आज सातारा जिल्ह्यात मोठया उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलांनी हनुमानाचे मंदिर व परिसर सजवण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दाखल होत दर्शन घेतले.
यावेळी सातारा, कोरेगाव मार्गावर जरंडेश्वर डोंगर आहे. हनुमानाने संजीवनी औषधीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्यातील काही पडलेला भाग म्हणजे जरंडेश्वर अशी अख्यायिका आहे. दरम्यान जरंडेश्वर डोंगरावर गुरुवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासून हनुमान भक्तांनी उपस्थिती लावली होती.
कोरेगावच्या जरंडेश्वर डोंगरावर हनुमान जन्मोत्सव उत्साहात pic.twitter.com/WgIPD6Pqsl
— santosh gurav (@santosh29590931) April 6, 2023
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाल्याने जरंडेश्वरला मोठ्या यात्रेचे स्वरूप मिळालेले आहे. यावेळी भाविकांकडून हनुमान मंदीरात सिताफळ, रामफळ आणि हनुमान फळ याची पूजा देखील करण्यात आली.