हरभजनने कामरान अकमलला सुनावले!! म्हणाला, नालायका तुमच्या आया बहिणींना…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकटपटू कामरान अकमलने भारताचा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग च्या धर्माबाबत केलेल्या विधानानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अकमलला चांगलंच सुनावलं आहे. पाकिस्तान विरुद्व अर्शदीप शेवटची ओव्हर टाकत असताना सरदारला ही ओव्हर का दिली? त्यात आता १२ वाजले आहेत असं उपहासात्मक विधान अकमलने (Kamran Akmal) केलं होतं, त्यावर प्रत्युत्तर देताना हरभजनने अकमलची आई- बहीण काढली आहे.

काय म्हणाला हरभजन?

एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “हे एक अतिशय मूर्खपणाचे आणि अतिशय बालिश कृत्य आहे जे केवळ एक ‘अक्षम’ व्यक्तीच करू शकते. कामरान अकमलने हे समजून घेतले पाहिजे की एखाद्याच्या धर्माबद्दल काहीही बोलणे आणि मजा घेण्याची काहीही गरज नाही. त्याच्याबद्दल मला कामरान अकमलला विचारायचे आहे, तुला शिखांचा इतिहास माहित आहे का? शीख कोण आहेत आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवण्यासाठी शिखांनी काय काम केले आहे हे तुमच्या पूर्वजांना विचारा. कारण शीख लोकांनी रात्री 12 वाजता मुघलांवर हल्ला करून तुमच्या माता-भगिनींना वाचवले होते, त्यामुळे फालतू बोलणे बंद करा.

दरम्यान, कामरान अकमलने आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. मात्र यानंतरही हरभजनने त्याला माफ केलेलं नाही. हरभजन म्हणाला, “त्याला इतक्या लवकर समजले आणि माफी मागितली हे चांगले आहे, पण अकमलने इथून पुढे कोणत्याही शीख किंवा इतर धर्माला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, मग तो इस्लाम असो, शीख असो किंवा ख्रिश्चन असो.” , एकमेकांच्या धर्माचा आदर कसा करायचा हे कळले तर कोणालाच त्रास होणार नाही असं म्हणत हरभजनने अकमलला सुनावलं.