हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 66 धावांनी दारुण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाची चिंता वाढली असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला आणि पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे. गेल्या काही दिवसापासुन हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. मागील वर्षापासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. संपूर्ण आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून केवळ बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अॅक्शनवर तसंच बोलिंग स्पीडवर काम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचं स्वत: कर्णधार कोहलीने मान्य केलं. अशातच बोलिंगचा सहाव्या पर्यायासाठी भारतीय संघाने दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घेणे आवश्यक आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
तसेच दुसरा अष्टपैलू म्हणून निवड समितीने क्रुणालच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही असा सल्ला देखील हार्दिकने दिला . भारतीय संघाकडे दुसरे पर्याय असतील तर त्यांचाही त्यांनी विचार करायला हवा. पण नसतील तर क्रुणालचा पर्याय आहे”.असे तो म्हणाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’