वानखेडेवरही हार्दिक पंड्याच्या विरोधात नारेबाजी होणार??

Hardik Pandya Mumbai (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होते. ज्या गुजरात टायटन्सला हार्दिकने आयपीएल विजेतेपद जिंकवून दिले त्याच चाहत्यांनी त्याला भर मैदानात डिवचल्याने मोठी खळबळ उडाली होती. रोहित शर्मा ऐवजी हार्दिकला कर्णधार करण्यात आल्यानेच रोहित प्रेमी चाहत्यांकडून त्याच्यावर निशाणा साधण्यात येतोय. मात्र आता १ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडेवरील सामन्यात हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला आणखी सामोरे जावं लागेल असं मत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.

पीटीआय व्हिडिओला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी (Manoj Tiwari) म्हणाले, मुंबईत हार्दिक पांड्याचे स्वागत कसे होते ते तुम्हाला पाहावे लागेल. मला वाटतं मुंबईत हार्दिकला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात चिडवलं जाईल. कारण रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात येईल असं असं कोणालाही वाटलं नव्हतं. रोहितने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाच ट्रॉफी जिकवून दिल्या, तरीही त्याला कर्णधारपदावरून का काढण्यात आले ते मला माहित नाही, मात्र मुंबईच्या चाहत्यांना हि गोष्ट आवडलेली नाही. त्यामुळेच मैदानावर हार्दिक विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मात्र अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी आवश्यक संयम हार्दिककडे आहे.

पहिल्या सामन्यात काय घडलं ?

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात हार्दिक पंड्या टॉस साठी मैदानात उतरताच प्रेक्षकांनी मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. एवढच नव्हे तर हार्दिक जेव्हा पहिले षटक टाकू लागला तेव्हाही त्याच्याविरोधात नारेबाजी प्रेक्षकांनी दिली. एका व्हायरल व्हिडिओ मध्ये तर एक प्रेक्षक त्याला छपरी नावाने हाक मारताना दिसत होता. एकूणच काय तर हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं.