आता तिकीट मिळाले तरी घेणार नाही, हरिश्चंद्र चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

‘भाजपमध्ये चमचे टोळके कार्यरत आहेत. त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली’ अशी अप्रत्यक्ष टीका खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. जे संकट मोचन म्हणून महाराष्ट्रभर मिरवत आहेत तेच भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्र्यांचे संकट होऊ नये याची भिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापासून सांभाळून राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गेल्या निवडणुकीत पवार या पंतप्रधान मोदींना शिव्या घालत होत्या आणि आता त्यांनाच उमेदवारी दिली. पक्षातील अन्य कोणालाही उमेदवारी दिली असती, तर मी काही म्हटले नसते. पक्षात काही जणांचे टोळके आहे ते चुकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे यासाठी करोडो रुपये मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह करतात. पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? असेही ते यावेळी म्हणाले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नाराज झालेले चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता तिकीट मिळाले तरी घेणार नसल्याचे ते म्हणाले. आदिवासींच्या २१ संघटना आमच्यासोबत असून संपूर्ण आदिवासी मतदार हा आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. माकप नेत्यांशी आमची बोलणी चालू आहे, असे सांगत त्यांनी माकपकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

हे पण वाचा –

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय भुंकप होण्याची शक्यता

नाशिक राष्ट्रवादीत फुट पडण्याची चिन्हे, हे आहे कारण…

सोशली उतावीळ बहाद्दरांचा बंदोबस्त करणार – विश्वास नांगरे पाटील

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!

सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर