पुणे प्रतिनिधी | काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कारभारी हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच पक्षातून धक्का मिळेल, असे त्यांना कधीच वाटले नसते. पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने पाटील यांना पक्षांकडूनच मोठा धक्का देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी चर्चेत असलेल्या अंकिता पाटील यांच्या नावाचा पत्ता कापत ऐनवेळी दत्ता झुरंगे यांचे नाव समोर आले आहे.
२५ हजार कोटींचा बँक घोटाळा ; अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनानंतर नुकताच पुणे जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या म्हणून अंकिता निवडून आल्या आहेत. स्थायी समितीच्या सर्वांत तरुण सदस्य म्हणून त्यांची आज निवड होणार होती. मात्र, हर्षवर्धन पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अंकिता पाटील यांचा पत्ता कट केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताच भ्रष्ट बबन्याचा पावन बबनराव झाला : धनंजय मुंडे
जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी अंकिता पाटील यांच्याऐवजी दत्ता झुरुंगे यांची स्थायी समितीवर निवड करावी, असे पत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांना दिले. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत झुरुंगे यांची निवड होणार आहे. त्यामुळे झुरुंगे यांचा कृषी समितीचा राजीनामा घेत तो तातडीने मंजूर करण्यात आला. सध्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरु असून, या सभेत कुठल्याही क्षणी झुरंगे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.