हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलने केले जात आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरीही आंदोलन करत असून देशभरातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. अशात हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे खट्टर यांनी म्हंटले.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेतले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशात शेतकऱयांकडून केंद्र सरकार विरोधात आंदोलनेही केले जात आहेत. अशा परिस्थितीत भाजप नेते तथा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर चंदीगड येथे शेतकऱ्यांच्याच एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, आपल्या परिसरातील एक हजार लोकांनी काठ्या हातात घेऊन शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जावे. त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांचा बंदोबस्त करावा. ते जर थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर द्या. फार काय दोन तीन महिने तुरुंगात राहाल तर मोठे नेते व्हाल. जामिनाची काही चिंता करू नका.”
Violent heartless sinister
Should he be Chief Minister?#किसान_हत्यारी_भाजपासरकार pic.twitter.com/wvcR1bRm1P— Manoj Mehta (@ManojMehtamm) October 3, 2021
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशातील शेतकरी अजून संतापले आहेत. यावर विविध राजकीय पक्षांकडून टीकाही हाऊ लागली आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात निर्णय घेतल्याने मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अक्षता हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपला शेतकऱ्यांच्या अजून रोषाला सामोरे जावे लागणार हे नक्की.