हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारपेठेत SUV नंतर (Hatchback Car) हॅचबॅकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे. परवडणारी किंमत आणि दैनंदिन वापरासाठी सुलभ या कारणांनी हॅचबॅक कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तुम्ही सुद्धा या नव्या वर्षात नवी हॅचबॅक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला ४ हॅचबॅक गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. चला तर याबाबत जाणून घेऊया…
टाटा टियागो- Tata Tiago
सब-कॉम्पैक्ट हैचबैक सेगमेंट (Hatchback Car) मध्ये टाटाची एंट्री दमदार आहे. Tiago सहा ट्रिम लेव्हलसह उपलब्ध आहेत. यामध्ये XE, XT, XT(O), XT, XZ, XZ+ आणि NRG या ट्रीमचा समावेश आहे. तर CNG व्हेरियंट फक्त चार ट्रिम्स XE, XM, XT आणि XZ+ ट्रिम लेव्हलसह उपलब्ध आहे. टाटा टियागो मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) सह 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. टाटा टियागोच्या किंमती 6.12 लाख रुपये पासून सुरू होतात आणि ड्युअल-टोन पेंटमध्ये CNG ट्रिमसह 8.91 लाखांपर्यंत जातात.
मारुती सुझुकी अल्टो K10- (Hatchback Car)
अनेक ग्राहकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मारुती सुझुकीची अल्टो सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. मारुतीची Alto K10 चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Std, LXi, VXi आणि VXi+ या ट्रीमचा समावेश आहे . Alto K10 चे सीएनजी व्हेरियंट VXi व्हेरियंटसह येते. Alto K10 मध्ये तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. याचे 1.0-लिटर इंजिन 66 Bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. (Hatchback Car) हे 5-स्पीड मॅन्युअल/AMT सह जोडलेले आहे. Alto K10 या हॅचबॅक गाडीची किंमत 4.42 लाख रुपये पासून सुरू होते आणि CNG मॉडेल सह 6.56 लाख रुपये पर्यंत जाते .
ह्युंदाई i20- Hyundai i20
10 रुपयांपर्यंत हॅचबॅक कार खरेदी (Hatchback Car) करायची असेल तर ह्युंदाई ची i20 तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट डील ठरू शकते. स्टायलिश अंदाज आणि दमदार फीचर्स सह येणारी हि हॅचबॅक चार ट्रिम लेवल सह येते. यामध्ये मैग्ना, स्पोर्ट्ज, एस्टा और एस्टा यांचा समावेश आहे. ह्युंदाईची i20 तीन इंजिन पर्यायांसह चार ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. Hyundai i20 च्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या कारची किंमत 8.08 लाख रुपयांपासून 13.36 लाख रुपये पर्यंत जाते.
हे पण वाचा :
लवकरच लॉन्च होणार Maruti Wagon R चे Electric व्हर्जन; काय असेल किंमत?
Auto Expo 2023 : देशातील पहिली Solar Electric Car! 45 मिनिटांत फुल्ल चार्ज; 250 किमी रेंज
Auto Expo 2023 : या Electric Car चा लूक पाहून तुम्हीही हीच्या प्रेमात पडाल
Mahindra Thar : आता मिळणार अगदी स्वस्तात; गाडीच्या फिचर्समध्येही होणार बदल