नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी आयकर विभागाने (Income Tax Department) नियमित अंतराने करदात्यांना टॅक्स रिफंड (Tax Refund) थेट बँक खात्यात ट्रान्सफर करुन मोठा दिलासा दिला. यावेळी विभागातून वारंवार ई-मेलद्वारे कर भरणाऱ्यांनाही (Taxpayers) माहिती दिली जात आहे. आता विभागाने ट्विट केले आहे की ,आमच्याकडून पाठविलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका. प्राप्तिकर विभाग सांगत आहे की, आमच्या बाजूने काही ई-मेल पाठवले गेले असतील तर ते महत्त्वाचे आहेत.
विभागाने अधिकृत मेल आयडी शेअर केली
करदात्यांसमोर (Taxpayers) सर्वात मोठी समस्या ही आहे की, विभागाने पाठविलेले ई-मेल योग्य आहे आणि कोणत्या फसवणूकी साठी ते पाठविले गेले नाही आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांची ही समस्या समजून घेऊन काही काळापूर्वी माहिती शेअर केली होती. विभागाने ई-मेल पाठविला होता, त्यामध्ये सर्व अधिकृत ईमेल आयडी, एसएमएस सेंडर आयडी आणि वेबसाइटची माहिती दिली होती. विभागाने ईमेलमध्ये लिहिले होते की, या लिस्ट मध्ये दिलेल्या शिवाय इतर कोणत्याही आयडीवरून आलेले मेल्स किंवा मेसेजेस उघडू नका. तसेच कोणत्याही प्रकारची माहितीही शेअर करू नका. प्राप्तिकर विभाग म्हणाले की, नेहमी क्लिक करण्यापूर्वी तपासा. केवळ या स्रोतांवरच विश्वास ठेवा.
प्राप्तिकर विभागाचा अधिकृत ईमेल आयडी
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या लिस्ट मध्ये @incometax.gov.in, @incometaxindiaefiling.gov.in, @tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @insight.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com या आयडीवरील ईमेल किंवा मेसेजलाच उत्तर द्या असे विभागाने म्हटले आहे. विभागाने पाठविलेल्या मेसेजस आयडी ITDEPT, ITDEFL, TDSCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN आहेत.
विभागाने अधिकृत वेबसाइटची माहिती दिली
प्राप्तिकर विभागाची अधिकृत वेबसाइट www.incometaxindia.gov.in आहे. त्याचबरोबर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in आहे. याशिवाय TDS संबंधित माहिती www.tdscpc.gov.in वर संपर्क साधता येईल. याशिवाय आपण अनुपालन व अहवाल देण्यासाठी www.insight.gov.in वर लॉग इन करू शकता. याशिवाय, करदाते www.nsdl.co.in आणि www.utiitsl.com वर पॅनकार्डशी संबंधित सेवांसाठी लॉग इन करू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.