नवी दिल्ली । आपला इनकम टॅक्स रिफंड (Income Tax refund) अजूनही मिळालेला नाही? कुठेतरी आपण देखील ‘या’ 3 चुका तर केल्या नाहीत ना. रिफंड न मिळाल्यास त्वरित चेक करा. अनेकदा करदात्यांना आठवड्याभरातच रिफंड मिळतो तर कधीकधी खूपच वेळ लागतो. आपण आपल्या टॅक्स रिफंडची स्थिती कशी तपासायची आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला रिफंड मिळण्यास उशीर झाला असेल हे जाणून घेउयात.
आपण बँकेचे डिटेल्स चुकीचे भरले असल्यास किंवा आपण काही गडबड केली असल्यास आपल्याला रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. याशिवाय बँक खाते प्रीव्हॅलिडेट नसेल तरीही रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो. तसेच, जर तुमचा आयटीआर व्हेरिफाइड नसेल तरीही रिफंड मिळविण्यास वेळ लागेल.
इनकम टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याचे मार्ग
1. NSDL वेबसाइटवर चेक करा –
> आपल्या रिफंडचे स्टेटस आपण www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर ऑनलाइन शोधू शकता.
> यापैकी कोणत्याही वेबसाइटवर लॉग ऑन करा आणि टॅक्स रिफंड स्टेटसच्या टॅबवर क्लिक करा.
> आपला पॅन नंबर आणि एसेसमेंट ईयर एंटर करा ज्यासाठी रिफंड पेंडिंग आहे.
> जर डिपार्टमेंटने रिफंड प्रोसेस केली असेल तर आपल्याला मोड ऑफ पेमेंट, रेफरेंस नंबर, स्टेटस आणि रिफंडच्या तारखेचा मेसेज मिळेल.
> रिफंड वर प्रोसेस केली गेली नसेल तर रिफंड दिली गेली नाही असाच मेसेज येईल.
2. ई-फाईलिंग पोर्टलवर चेक करा –
> येथे क्लिक करा आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये एंटर करा.
> रिटर्न / फॉर्म पहा.
> माय अकाउंट टॅब वर जा आणि इनकम टॅक्स रिटर्न सेलेक्ट करा.
> सबमिटवर क्लिक करा.
> पावती (acknowledgement) नंबरवर क्लिक करा.
> इनकम टॅक्स रिफंडच्या स्थितीसह आपले रिटर्न डिटेल्स दाखविणारे एक पेज दिसेल.
टॅक्स रिफंड म्हणजे काय?
प्राप्तीकर देयकाचा प्राप्तिकर त्याच्या अंदाजित गुंतवणूकीच्या कागदपत्रांच्या आधारावर आर्थिक वर्षात ऍडव्हान्स मध्ये कट केला जातो. परंतु जेव्हा तो आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम कागदपत्रे सबमिट करतो, त्याचा टॅक्स अधिक कपात झाल्याची खातरजमा झाल्यास आणि त्याला प्राप्तिकर खात्यातून पैसे काढायांचे असतील तर तो रिफंडसाठी आयटीआर दाखल करतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.