HDFC Bank | HDFC बँकेने ग्राहकांना दिला सतर्कतेचा इशारा, पगार खात्यात जमा होण्यास येणार अडचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Bank | HDFC बँक ही आपल्या देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना नेहमीच वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते आणि ग्राहक देखील त्यांच्याशी जोडून राहतात. अशातच आता HDFC बँकेने त्यांच्या खातेदारांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. या बँकेने त्यांच्या खातेदारांना ईमेल त्याचप्रमाणे फोनद्वारे आवश्यक अशी माहिती दिलेली आहे. बँकेने (HDFC Bank) पाठवलेल्या या माहितीनुसार आता 1 एप्रिल रोजी NEFT व्यवहाराची सुविधा उपलब्ध राहणार नाही.

HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार आता 1 एप्रिल 2024 रोजी NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर व्यवहारांची सुविधा उपलब्ध होणार नाही. 31 मार्च रोजी 2023- 24 चे आर्थिक वर्ष संपत आहे. या कार्यवाहीमुळे 1 एप्रिल रोजी हस्तांतरित करण्यास अडचण येऊ शकते.

1 एप्रिल रोजी HDFC बँकेसोबत व्यवहार करताना अडचण येईल

1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे या दिवशी तुमच्या अनेक व्यवहारांमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसामुळे बँकेची NEFT सेवा बंद राहणार आहेत. किंवा त्यात काही अडचणी येऊ शकता. बँकेने म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या समाप्तीशी संबंध प्रक्रियेमुळे NEFTव्यवहार सेवेमध्ये अडचण येऊ शकते.

1 एप्रिल रोजी पगार येण्यास देखील अडचण | HDFC Bank

तुमचा पगार जर 1 तारखेला होणार असेल तर HDFC बँकेमध्ये तो वेळेवर येण्यास अडचण येऊ शकते. बँकेच्या काही निवडक ग्राहकांसाठी येण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी यामध्ये समस्या येण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि याची माहिती त्यांनी ग्राहकांना आधीच मेल द्वारे आणि एसएमएस द्वारे सांगितलेली आहे,

1 एप्रिल रोजी जर NEFT द्वारे तुमचा पगार झाला तर तो तुमच्या बँक खात्यातील हस्तांतरित होण्यासाठी वेळ लागू शकतो. किंवा काही समस्या येऊ शकतात असे देखील बँकेने आधीच सांगितलेले आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीत NEFT ऐवजी तुम्ही IMPS, RTGS किंवा UPI द्वारे पैशांचा व्यवहार करू शकता. असे देखील बँकेने सांगितलेली आहे.

1 एप्रिल रोजी बँक बंद
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व बँका सुरू राहणार नाही. आरबीआयच्या सूचनानुसार वार्षिक खाते बंद केल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद ठेवण्यात आलेले आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार आता मिझोराम, चंदिगड, सिक्कीम, बंगाल हिमाचल, प्रदेश आणि मेघालय ही राज्य वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये 1 एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत.