हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC Bank चे नाव देखील सामील झाले आहे. कारण बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates
17 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 17 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. बुधवारी RBI ने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स (0.25 टक्के) वाढ करून 6.50 टक्क्यांवर नेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. आता HDFC Bank कडून 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 4.75% ते 7.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 5.25% ते 7.75% दराने व्याज दिले जात आहे. FD Rates
HDFC Bank च्या एफडीचे नवीन दर (FD Rates)
कालावधी व्याजदर
7 ते 29 दिवस 4.75%
30 ते 45 दिवस 5.50%
46 ते 60 दिवस 5.75%
61 ते 89 दिवस 6.00%
90 दिवस ते 6 महिने 6.50%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने 6.65%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष 6.75%
1 वर्ष ते 15 महिने 7.00%
15 महिने ते 2 वर्ष 7.15%
2 वर्षे 1 दिवस ते 10 वर्ष 7.00%
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/save/deposits/fixed-deposit-interest-rate
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा