HDFC बँक Paytm च्या सहकार्याने लॉन्च करत आहे नवीन क्रेडिट कार्ड, आता ग्राहकांना मिळेल मोठा लाभ; त्याबाबत अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खाजगी क्षेत्रातील कर्ज देणारी सर्वात मोठी एचडीएफसी बँक प्रमुख ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पेटीएमसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्डची विक्री सुरू करेल. सणासुदीच्या हंगामापूर्वी कंपनी क्रेडिट कार्ड जारी करेल. बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,” हे क्रेडिट कार्ड व्हिसाद्वारे ऑपरेट केले जातील आणि त्यात मिलेनियल्स (1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली लोकं), बिझनेस ओनर्स आणि व्यापारी यांना लक्ष्यित ऑफरचा समावेश असेल.

पेटीएमचे 33 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि सुमारे 21 कोटी व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा एक्ससेस आहे. दुसरीकडे, एचडीएफसी बँकेकडे 50 लाखांहून अधिक डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड आहेत आणि 20 लाख व्यापाऱ्यांना त्यांच्या ऑफरद्वारे सर्व्हिस देतात.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या?
एचडीएफसी बँक सणासुदीचा विचार करता नवीन कार्ड लाँच करत आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहक क्रेडिट कार्डचा अधिक वापर करतात, असे बँकेने म्हटले आहे. यात जी काही उत्पादने समाविष्ट केली जातील, ती डिसेंबरपर्यंत लाँच केली जातील. या निर्णयामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल. बँकेने सांगितले की,” त्यांना करोडो पेटीएम ग्राहकांची साथ मिळेल, तसेच देशातील छोट्या शहरांमध्ये बँकेची पकड मजबूत होईल.”

दरमहा 3 लाख कार्डे विकतील
बँकेने सांगितले की,” ते आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी डिस्‍ट्रीब्‍यूशन पार्टनरशिपवर लक्ष केंद्रित करतील, ज्याचे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत क्रेडिट कार्ड विक्री मासिक 5 लाख कार्ड पर्यंत वाढवण्याचे आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत बँक दरमहा 3 लाख कार्ड विक्री साध्य करेल. पेटीएमचे मुख्य कार्यकारी भावेश गुप्ता यांनी या पार्टनरशिपबाबत सांगितले की,”कंपनी एचडीएफसी बँक आणि व्हिसा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक ग्राहक विभागाला लक्ष्य करणार आहे.”

Leave a Comment