हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या कर्जदरात 0.05 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यानंतर आता या बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच बँकेचे हे नवीन दर 07 मार्च 2023 पासून लागू होतील.
HDFC Bank च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता ओव्हरनाईटचा MCLR रेट 8.65 टक्के, एका महिन्यासाठीचा MCLR रेट 8.65 टक्के, तीन महिन्यांसाठीचा MCLR रेट 8.70 टक्के आणि सहा महिन्यांसाठीचा MCLR रेट 8.80 टक्के तसेच एका वर्षासाठी 8.95 टक्के, दोन वर्षांसाठीचा MCLR रेट 9.05 टक्के आणि तीन वर्षांसाठी 9.15 टक्के झाला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/content/bbp/repositories/723fb80a-2dde-42a3-9793-7ae1be57c87f/?path=/Footer/Resource/Rates/MCLR.pdf
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ