HDFC Mutual Fund | आपल्या भविष्याच्या आर्थिक तरतुदीसाठी आजकाल अनेक लोक हे काही योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. जेणेकरून त्यांना भविष्यात जाऊन अडीअडचणीच्या वेळेस त्याचा खूप चांगला परतावा होतो. आणि त्यांचे म्हातारपण देखील खूप सुखात आनंदात जाते. त्याचप्रमाणे अनेक म्युच्युअल फंडस् देखील आहे ज्यात लोक गुंतवणूक करत असतात. अशातच आता एचडीएफसी (HDFC Mutual Fund)चार्ट टॉप फंड या ओपन इंडियन इक्विटी योजनेला 27 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि याचा सुमारे 19% चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर देण्यात आलेला आहे.
म्युच्युअल फंडने यात असे म्हटले आहे की या फंडात गुंतवलेली 10 हजार रुपयांची सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी ही 29 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढून 6.88 लाख रुपये कोटी रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजेच म्युच्युअल फंडात ज्यांनी गुंतवणूक केली होती ते लोक आता करोडपती होणार आहेत.
एचडीएफसी टॉप 100 फंड
एचडीएफसी टॉप १०० फंड प्रामुख्याने लार्ज कॅप शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. आणि हे ऑक्टोबर 1996 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे ही भारतातील सर्वात जास्त वेळ चालणारी म्युच्युअल फंडची योजना आहे.
एचडीएफसी टॉप 100 फंडची मुख्य वैशिष्ट्ये | HDFC Mutual Fund
जोखीम आणि समायोजित पोर्टफोलिओ
एचडीएफसी टॉप 100 फंड हे फेअर व्हॅल्यू इन्वेस्टमेंट ग्रोथ करत असतं. पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी उपलब्ध संधीचे जोखीम बक्षीस मूल्यांकन खूप आवश्यक असते. या स्थापित लाज कॅप कंपन्यांमध्ये 80% पेक्षा अधिक गुंतवणूक केलेली आहे.
एचडीएफसी टॉप ह100 फंड पोर्टफोलिओ
एचडीएफसी टॉप 100 फंडात अनेक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिवर असून त्यात आयसीआयसीआय बँक लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड , रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एनटीपीएस, इन्फोसिस बँक लिमिटेड, यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. भारतीय एअरटेल स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर हा पोर्टफोलिओ प्रामुख्याने लार्ज कॅप शेअर्सवर केंद्रित आहे ज्याचा वाटा 92 टक्के एवढा आहे.
लक्षणीय परतावा | HDFC Mutual Fund
5 वर्षे तसेच 3 वर्षे यांसारख्या लहान एसआयपी कालावधीने खूप चांगला परतावा देतात. एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह 5 वर्षाच्या एसआयपीमध्ये 17.95% कालावधीत वाढवून भेटण्याचे फंडाची क्षमता दर्शवतो. 3 वर्षाच्या एसआयपीसाठी एकूण गुंतवणुकीसाठी 3.6 लाख 19.15% आकर्षक होता ज्यामध्ये 1.20 लाखांनी 24.84% एवढा परतावा दिला आहे.