एक्स गर्लफ्रेंडचा फोटो डीपी ठेऊन ‘कलियुगाची द्रौपदी’ लिहणं पडलं भारी; करावी लागली हवालातची वारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजकोट । ब्रेकअपनंतर एका तरुणाने एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कलियुगाची द्रौपदी लिहिले आणि तो फोटो मोबाईल डीपीवर ठेवत तिची बदनामी केली. मुलीने हा डीपी पाहिल्यावर तिने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्याची अजब घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली.

पीडित मुलीचे हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते. राजकोटमध्येच या दोघांचे अफेअर सुरु झाले. मात्र,थोड्याच दिवसांत त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये कटुता आली. बॉयफ्रेंड पीडितेला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे गर्लफ्रेंड हे नातं कायमचं तोडलं. पीडित मुलीचे हितेषसोबत ब्रेकअप झाले. त्यानंतरही हा तरुण त्या तरुणीला अधिकच त्रास देऊ लागला. अखेर तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला बऱ्याचदा समजावून सांगितले. पण तो ऐकत नव्हता. अखेर त्याने तिची सोशल मीडियावरून बदनामी करायला सुरूवात केली.

बॉयफ्रेंडने एक्स गर्लफ्रेंडचा फोटो Whats Appवर अपलोड करून तिची बदनामी केली. ‘कलियुगाची द्रौपदी’ असं म्हणून त्या तरुणाने एक्स गर्लफ्रेंडचा फोटो आपल्या Whats App डिपीवर अपलोड केला. त्याचबरोबर तो तिला Whats App वरून अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी त्रस्त झाली होती. अखेर कंटाळून तिने एक्स बॉयफ्रेंडच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in