त्यानं… मुलासाठी घेतली चक्क चंद्रावर जमीन; जाणून घ्या त्यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्याला जर चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल, तर आपण पैसे देऊन जमीन खरेदी करू शकता. हो हे शक्य आहे. हे घडवलंय सूरतचे व्यापारी विजयभाई कथीरिया यांनी. त्यांनी आपल्या दोन महिन्याचा मुलग नित्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला. यावर त्यांना १३ मार्चला अॅप्रूवल मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले.

जमीन खरेदी केल्यावर त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्रही मिळालं आहे. त्यांना चंद्राच्या दुसर्‍या बाजूला जमीन दिली गेली आहे. त्या ठिकाणचे नाव मेर मॉस्कोव्हियन्स आहे. त्याला सी ऑफ मस्कॉवी देखील म्हणतात. जमीन खरेदीच्या किंमतीचा अहवालात खुलासा केला गेला नाही.

मात्र, याची किंमत ७५० डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ५४ हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रावर जमीन घेणारे विजयभाई सूरतचे पहिले व्यापारी ठरले आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा चंद्रावर जमीन खरेदी करतो तेव्हा त्याला एक प्रमाणपत्रही दिलं जातं. याला अत्यंत मोलाचं गिफ्ट समजलं जातं.