सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आजचे राजकारण वेगळ्या पद्धतीने चालले आहे. शरद पवार यांचे वय 82 वर्ष असून ते 4 वेळा मुख्यमंत्री असले तरी अधिकाऱ्यांचा मानसन्मान ठेऊन काम करून घेण्याची कसब त्यांनी दाखवली. ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात टिकले आहेत आणि आम्ही देखील तेच करत आहोत. मात्र आताचे ज्या पद्धस्तीने अधिकाऱ्यांना दमदाटी करत आहेत. पण त्यांचीही कधीतरी सत्ता जाणार आहे, हे काय कायमचे ताम्रपट घेऊन जन्माला आले नाहीत असे सांगत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अजित पवारांनी अप्रत्यक्ष टीका केली.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या 40 आमदारांवर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, साताऱ्यातील सोळशी येथील गावकऱ्यांनी त्यांच्या अन्यायाची भूमिका माझ्याकडे मांडली होती. आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करत असताना विरोध डावलून कधी काम केलं नाही. दंडुकेशाहीने लोकशाहीमध्ये काम करता येत नाही. कायदा हातात घेऊन कोणाला वाकवण्याचा प्रयत्न केल्यास जनता सहन करत नाही, असे सांगत राज्यसरकारमधील 40 आमदारांच्या आकड्याचा मजेशीर किस्सा सांगितला. 1995 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तेव्हाही 40 अपक्ष आमदार निवडून आले होते. आताही 40 आमदारांचा आकडा आहे. मुख्यमंत्र्यांभोवती या 40 लोकांचा सारखा गराडा असतो. दुसऱ्या लोकांना संधीच मिळत नाही, असे मला मंत्रालयातील लोक सांगतात. नकारात्मक करण्यापेक्षा सकारात्मक कामे करा असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला लागवला.
माझं चिडणे तर जगजाहीर करून टाकलं आहे. मी काय वेडा आहे का
माण मध्ये वाट्टेल ते करू पण या ठिकाणी MIDC होणारच. मागील काही निवडणुका जिंकल्या त्यावर समाधान मानायचे नाही. माण आणि खटाव येथे पवार साहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार घड्याळाच चिन्ह घेऊनच उभा राहील. कधीकधी कडक शब्दात हे सांगावे लागते असे सांगत माझं चिडणे हे तर जगजाहीर करून टाकलं आहे. मी काय वेडा आहे का? चिडत असतो तर बारामतीकरांनी निवडून दिल असत का? असे अजित पवारांनी मार्डी येथील शेतकरी मेळाव्यातील भाषणात सांगितले..
आमच्याकडे पण सत्ता होती पण आम्ही माज येऊ दिला नाही
आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्षे होतो. पवार साहेब केंद्रामध्ये कृषिमंत्री असताना आमच्याकडे पण सत्ता होती, राज्यातील सत्ता होती. पण आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. विरोधकांना कधी त्रास दिला नाही. अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीचे काम करू नका. दिवस बदलत असतात आम्ही कधी मंत्रालयात येऊन बसू हे कळणार पण नाही, असं सांगत सत्ता समीकरण बदलण्याचे संकेत शिंदे-फडणवीस सरकारला दिलेत.