हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । घरात तयार केलेले लोणी हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेमंद आहे. बाहेरून विकत आणलेल्या लोण्यापेक्षा जास्त फायदा हा घरी तयार केलेल्या लोण्यामध्ये आहे. घरी तयार केली लोण्यामध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त असते म्हणून अनेक लोक घरातले लोणी खात नाहीत. ताकापासून लोणी तयार करण्याची हि पारंपरिक पद्धत आहे. तयार केलेले लोणी वापरने आत्ता काही प्रमाणात कमी झाले आहे.
अनेक रासायनिक पद्धतीने तयार केलेले लोणी हे आपल्या घराच्या लोणीपेक्षा कितीतरी पटीने सात्वीक नसते. घरात काढलेल्या लोण्याला कच्चे लोणी म्हंटले जाते. अनेक रासायनिक पदार्थ टाकून तयार केलेल्या लोणीमध्ये टिकण्याची क्षमता फार कमी असते. तसेच त्याच्यातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. ताजे लोणी हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. अनेक वेळा गर्भवती महिलांना ताजे लोणी खाण्यासाठी दिले जाते. त्यामुळे लहान मुलांना दात येणे, त्याची तब्बेत मजबूत राहण्यास मदत होते. घरात तयार केलेले लोणी हे दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ वापरू नये.
लोण्यात कोलेस्ट्रॉल आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृद्यासारखा आजार निर्माण होऊ शकतो. विदेशात लोण्याचा वापर हा फार कमी प्रमाणात करतात. अनेकांनी लोणी खाणे बंद केले आहे. कारण त्याच्यापासून आपले वजन वाढू शकते. पांढरे लोणी जे आहे ते मुबलक रित्या शरीरात मिसळले जाते. पांढरे लोणी हे व्हिटॅमिन ए बरोबर व्हिटॅमिन के सोबत चा चांगला स्रोत आहे. पांढऱ्या लोण्यामुळे चयापचन क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आहारात काही प्रमाणात पांढऱ्या लोण्याचा समावेश हा असला पाहिजे .
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’