कराड प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तीन गावातील ग्रामस्थांसाठी तसेच वन्यजीव विभागातील सर्व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी कृष्णा हॉस्पिटल तर्फे तज्ञ डॉक्टर यांनी सहभाग घेतला. तीन गावातील जवळपास दोनशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी तसेच जवळपास तीस कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजयकुमार पाटील, डॉ. कुणाल सगाने, डॉ. कासिका, शल्य चिकित्सक डॉ. अनिकेत सुरुशे, डॉ. विपिन तीवानी, डॉ. निमेश श्रीवास्तव, अस्थीरोग तज्ञ डॉ. सुभाशिष दास, डॉ. सिदार्थ दर्वालु, फिजिशियन डॉ.प्रीतीश परिचारक, डॉ. वल्लभ मानाथकर, नेत्र तज्ञ डॉ. अभिराज माने, डॉ. गौरव खाड या बारा तज्ञ वरिष्ठ डॉक्टर व त्यांचे नर्सिग स्टाफ सहभागी झाले होते. शिबीर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मळे येथील सुरक्षा कुटीच्या जवळ घेण्यात आले.
शिबिरात सहभागी 40 रूग्णांवर पुढील उपचार व शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल अमित भोसले, संदीप कुंभार, क्रीएटीव्ह नेचर फ्रेंड्स संस्थेचे रोहन भाटे, नाना खामकर, हेमंत केंजळे यांंनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
डॉक्टरांचे व कृष्णा नर्सिग स्टाफचे स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांंनी केले. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे ह्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने कृष्णा हॉस्पिटल सर्व डॉक्टरांचे व स्टाफ यांचे आभार मानले.*
कृष्णा हॉस्पीटल मोफत ऑपरेशन करणार
या शिबिरात कृष्णा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले व वैद्यकीय संचालक डॉ ए.वाय.क्षिरसागर यांच्या विशेष सहकार्यामुळे सदर शबिरात सहभागी झालेल्या ग्रामास्थांपैकी ज्यांना ज्यांना पुढील उपचारासाठी विवध प्रकारचे ऑपरेशन – मोतीबिंदू, इतर पोटाचे ऑपरेशन तसेच पुढील उपचार हे कराड येथे कृष्णा हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा