मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट -अ पदाकरिता मोठी भरती होत आहे. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश असेल. सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 899 पदांसाठी होत आहे.
एकूण पदसंख्या – 899
वेतनश्रेणी – सातवा वेतन आयोग ( वेतनस्तर, एस -20रुपये 56,100-1,77,500)नुसार वेतन अनुज्ञेय राहिल.
वयोमर्यादा – दिनांक 1 एप्रिल रोजी प्रचलित नियमानुसार 38 वर्षं पेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत नियमाप्रमाणे शिथिलक्षम.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021
शैक्षणिक अर्हता –
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदासाठी –
सांविधिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अहर्ता.
वैद्यकीय अधिकरी (विशेषज्ञ)पदासाठी – सांविधिक विद्यापीठाची नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या समान अर्हतेची पदवीत्तर पदवी किंवा पदविका.
31 मार्च 2021 या दिनांक पूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता(internship) पूर्ण असणारे उमेदवार पात्र ठरतील
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी-1000
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी-500
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच आपल्या अर्ज दाखल करावा. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करा.
वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी Http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचा अर्ज पूर्ण भरून अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून संचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन सेंट जॉर्जेस रूग्णालय परिसर मुंबई यांच्या नावाने त्या कार्यालयात हस्त बट वड्याने किंवा नोंदणीकृत डाकने सादर करावा.