आरोग्य|बदलत्या जीवन शैलीमुळे मानवी जीवनात आरोग्याची निगा राखणे हा विषय मागे पडत चालला आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपल्याला आजार लगेच बाधतात आणि ते बराच काळबरे होत नाहीत अशा अवस्थेत आपण आहारचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या दैनंदिन जगण्यात काही बदल करावे लागतील. यासाठी खालील मुद्दे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
१) जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात… हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता…
२) तुमच्या मनात आहेत तेच चेहर्यावर दिसते… तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्यावरील उजळपणा वाढत राहील…
३) कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते… हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते…
४) तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करून थंड झाल्यावर तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो… हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते…
५) नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो…
६) रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत… सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल…
७) जेवणात अधिक खारट पणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत
असतो… अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात… जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते…
असतो… अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात… जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते…
८) वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये… आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे… वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही…
९) साखर ही वाईट नाही… उगाच साखरेच नाव वाईट आहे… साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते… त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापर करू शकतो…
१०) प्रत्येकाने व्यायाम व योगासना चा प्रकाराचा
निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा…
निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा…
११) सर्वच सजीवांना प्रथिनांची गरज आहे… अर्थात ही गरज प्रत्येकाचे वय, शारिरीक स्थिती, कामाचे स्वरुप यावर अवलंबून आहे…