हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांना तरुण लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त महाग किंमतींमध्ये Health Insurance उपलब्ध होतो. मात्र जेव्हा कधी क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा कंपन्याकडून त्यांना पैसे देण्यासाठी जास्त वेळ लावला जातो.
एका इन्शुरन्स ब्रोकरेज फर्मने केलेल्या सर्वे मधून असे दिसून आले की, हेल्थ इन्शुरन्ससाठी जेष्ठ नागरिकांना 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांपेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागते. यासाठी जवळपास एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. SecureNow नावाच्या फर्मने 1,250 हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींद्वारे हा सर्वे केला आहे. ज्यामध्ये 576 Health Insurance हे ज्येष्ठ नागरिकांचे (60 वर्षांपेक्षा जास्त) होते.
सर्वेमध्ये काय निष्पन्न झाले ???
या सर्वेमध्ये असे म्हटले आहे गेले की,” 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना Health Insurance क्लेम मिळविण्यासाठी सरासरी 23.2 दिवस थांबावे लागते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हा कालावधी 28 दिवसांपर्यंत वाढतो. या सर्वेनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी इन्शुरन्स कंपन्यांकडून जी पावले उचलली जात आहेत त्यामध्ये अजूनही सुधारणा होण्याची गरज आहे.
उशीर होण्यामागील मुख्य कारण जाणून घ्या
SecureNow च्या मते, ज्येष्ठ नागरिकांना क्लेम मिळण्यास उशीर होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच आजाराची माहिती इन्शुरन्स कंपनीला न देणे हे आहे. SecureNow चे सह-संस्थापक कपिल मेहता याबाबत सांगतात की,” ज्येष्ठ नागरिकांना क्लेम मिळण्यास उशीर होण्यामागील कारण म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ काढावा लागतो. तसेच त्यांच्या उपचारांसाठीचा खर्च देखील जास्त असतो. याशिवाय त्यांना अधिक विमा वजावटही मिळते. अशा परिस्थितीत या सर्व कामांमध्ये कंपन्याकडून सामान्य इन्शुरन्सपेक्षा जास्त वेळ घेतला जातो.”
6 पट जास्त प्रीमियम
मेहता म्हणाले की,”तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांद्वारे भरण्यात येणाऱ्या इन्शुरन्सच्या प्रीमियमची तुलना केली तर यामध्ये मोठा फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, 30 वर्ष वय असलेला व्यक्ती जेवढा प्रीमियम देतो, त्याच्या 6 पट जास्त प्रीमियम 75 वर्षांच्या व्यक्तीला भरावा लागतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी कंपन्यांना मदत करावी लागेल. Health Insurance
इथे हे लक्षात घ्या कि, क्लेम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे ही जबाबदारी इन्शुरन्स कंपन्या, मध्यस्थ आणि रुग्णालयांची आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांकडूनही वेळोवेळी आपल्या Health Insurance पॉलिसीचे योग्य मूल्यमापन केले जावे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.policybazaar.com/health-insurance/health-insurance-india/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…
ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!