हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा चहा नाही पिला गेला तर लोकांना चुकल्यासारखे वाटते. चहा पिण्याची सवय अनेकदा फार जास्त वाढते आणि त्याचे नुकसान वेळोवेळी बघायला मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. लहान मुलांना चहा पिण्यास दिला जात नाही. कारण चहा मध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात कॅफिन असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने उलटी होते . तसेच पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात होते.
रोज एकपेक्षा जास्त वेळ चहा प्यायल्याने स्केलेटल फ्लोरोसिससारखा आजार होऊ शकतो. या आजारात आपली हाडे आतल्या आत कमजोर होता. चहाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. सामान्य चहाऐवजी ग्रीन टी, हर्बल टी सेवन करा. जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेच चहा घेऊ नका.त्यासोबतच चहाची आठवण झाल्यावर छाछ, नारळाचं पाणी किंवा ज्यूस प्यायल्याने चहाची सवय सुटू शकते. चहा दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. खासकरुन रिकाम्या पोटी तर अजिबात घेऊ नये. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पित्ताचा त्रास होतो. प्रवासाला जाण्यापूर्वी कधी सुद्धा चहा घेऊ नये.
दररोज च्या चहाच्या सेवनाने हाडे ठिसूळ होतात. तुमची प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच सारखा जर चहा पिला तर तुमची भूक कमी होते. सतत चहा पिल्याने सारखी सारखी चहा पिण्याची तल्लफ होते. चहाने हाडांचं नुकसान होते. पण ते अचानक न होता हळूहळू शरीराची झीज होण्यास सुरुवात होते. चहाचा प्रभाव चहाची क्वालिटी, पिणाऱ्याचं शरीर आणि जेनेटिक्सच्या स्थितीवर निर्भर करतं. त्यासोबत चहा घेण्याची वेळ आणि चहा तयार करण्याची पद्धत यावरही निर्भर असतं. दुध आणि साखर असलेला चहा सतत पित राहणे चांगले नाही.चहा प्यायल्यानंतर गुरळा करा आणि अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्यावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’