हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगगुरू रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’ अस वादग्रस्त विधान केल्यानंतर IMA ने आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. हे विधान मी मागे घेत आहे आणि या वादावर पडदा टाकत आहे,” असे ते म्हणाले.
रामदेवबाबा आपल्या पत्रात म्हणाले की, मी सर्व उपचार पद्धतींचा आदरच करतो. मी व्हॉट्सअप मेसेज वाचवून दाखवत होतो. माझे विधान संदर्भ वगळून घेण्यात आले आहे.”कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी आपली जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले या गोष्टीचा मला आदरच आहे.
माननीय श्री @drharshvardhan जी आपका पत्र प्राप्त हुआ,
उसके संदर्भ में चिकित्सा पद्दतियों के संघर्ष के इस पूरे विवाद को खेदपूर्वक विराम देते हुए मैं अपना वक्तव्य वापिस लेता हूँ और यह पत्र आपको संप्रेषित कर रहा हूं- pic.twitter.com/jEAr59VtEe— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 23, 2021
यानंतर आरोग्यमंत्र्यांनीही तत्काळ बाबा रामदेव यांचा माफीनामा स्वीकारल्याचं जाहीर करून टाकलंय. ‘बाबा रामदेव यांनी अॅलोपॅतथिक उपचारपद्धतीवर केलेलं आपलं वक्तव्य मागे घेत प्रकरणाला विराम दिला आहे. हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्ततेचं उदाहरण आहे. भारतानं कोविड १९ चा सामना अत्यंत दृढनिश्चयानं केला हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. आपला विजय निश्चित आहे’ असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय
बाबा @yogrishiramdev जी ने एलोपैथिक चिकित्सा पर अपना बयान वापस लेकर जिस तरह पूरे मामले को विराम दिया है, वह
स्वागतयोग्य व उनकी परिपक्वता का परिचायक है।हमें पूरी दुनिया को दिखाना है कि भारत के लोगों ने किस प्रकार डट कर #COVID19 का सामना किया है। नि:संदेह हमारी जीत निश्चित है ! https://t.co/0XVXULVrH0
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 23, 2021
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.