खरंच… चीनमधील वुहान लॅबमधून पसरला कोरोना? साथीच्या आजारापूर्वी 3 कर्मचारी अचानक पडले होते आजारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । जगभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार होऊन दीड वर्षांचा काळ झाला आहे, परंतु हा विषाणू कोठून आला याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्याच्या एका महिन्यांपूर्वीच चिनी इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) चे तीन कर्मचारी आजारी पडले होते.

अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे तीन संशोधक आजारी पडले होते त्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागले. अमेरिकेच्या या इंटेलिजेंस रिपोर्टमध्ये वुहान लॅबच्या या आजारी संशोधकांची संख्या, वेळ आणि इस्पितळात भरतीसंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचा हा गुप्तचर अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक बैठक होणार आहे ज्यामध्ये कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयीच्या पुढील तपासणीची चर्चा केली जाईल.

यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक टीम वुहान येथे कोरोना विषाणूशी संबंधित तथ्य शोधण्यासाठी गेली होती. यावेळी पथकाने वुहान लॅबलाही भेट दिली. यानंतर, WHO ने म्हटले आहे की,” वुहानच्या प्रयोगशाळेद्वारे कोरोना विषाणू जगभर पसरला आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाही. CNN च्या अहवालानुसार, चीनने 8 डिसेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) सांगितले की, कोविड सारख्या लक्षणांचा पहिला रुग्ण वुहानमध्ये आढळून आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनेच चिनी संशोधकांना रुग्णालयात दाखल केल्याचा पहिला अहवाल प्रकाशित केला.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालावर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, ते म्हणाले की,”चीनमधील कोरोनाचा पहिला रुग्ण आणि या साथीच्या सुरुवातीच्या दिवसात याविषयी बिडेन प्रशासनाकडे अनेक गंभीर प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.” ते म्हणाले की,” अमेरिकन सरकार WHO आणि अन्य सदस्य देशांसमवेत राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या कोरोना महामारीचे मूळ शोधण्यासाठी कार्यरत आहे.”

वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, वुहान लॅबमधील संशोधकांच्या माहितीशी परिचित काही सद्य आणि माजी अधिकाऱ्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेविषयी अनेक मते व्यक्त केली. अधिकाऱ्याने सांगितले की,”यासाठी अधिक तपास आणि अतिरिक्त पुष्टीकरण आवश्यक आहे.”

गेल्या वर्षी मार्चमध्ये युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, कॅनडा, ब्रिटन आणि इतर देशांनी WHO च्या नेतृत्वाखालील COVID-19 च्या मूळ उत्पत्ती अभ्यासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी अमेरिकेने चीनवर या विषाणूच्या प्रसाराबद्दल गंभीर शंका व्यक्त केली होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला ‘चिनी व्हायरस’ आणि ‘वुहान व्हायरस’ असे म्हटले. ट्रम्प यांनी चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टीमला तपासणीत पूर्ण सपोर्ट केला नसल्याचा आरोप केला आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपविली. चीनने यावर कडक आक्षेप नोंदविला होता.

सध्याची उपलब्ध असलेली माहिती याची पुष्टी करते की, हा व्हायरस नैसर्गिकरित्या आला असावा. हे एखाद्या प्राण्याद्वारे मनुष्यांपर्यंत पोहोचले असेल, परंतु हा व्हायरस वुहान इन्स्टिट्यूटच्या गळतीमुळे पसरला हे नाकारता येत नाही. या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू असलेल्या वटवाघळावर संशोधन केली जात होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment