हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते विसरतो. कामाच्या व्यापात आपण कितीतरी गोष्टी विसरतोय हे लक्षात येऊनही आपल्याकडून दुर्लक्ष केले जाते. पण खरंच फक्त वर्क लोडमुळे आपण गोष्टी विसरतो का..?
दिवसभरातून एखादं काम आपण विसरलो तर एकवेळ ठीक आहे. पण जर अशा घटना वारंवार होत असतील तर याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण विसरभोळेपणा हा आजार नसला तरीही आरोग्याच्या दृष्टीने इतर शारीरिक व्याधींचा संकेत असतो. त्यामुळे कितीही धावपळीचं शेड्युल असलं तरीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हीही विसरभोळेपणाच्या समस्येला सामोरे जात असाल तर घाबरू नका. आपल्या आहारात आणि दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा समावेश करून हि समस्या वेळीच आटोक्यात आणता येते. (Health Tips) यासाठी आपण स्मरणशक्ती कशी वाढवता येईल..? यासाठी काय करायला हवे..? ते जाणून घेऊयात.
० स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करावयाचे उपाय (Health Tips) :-
१) दैनंदिन आहारात भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा –
आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितके आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, असे तज्ञ सांगतात. आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचादेखील एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात अधिकाधिक भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
२) आहारात ब्रेन फूड्सचा समावेश करा –
आपल्या मेंदूला निरोगी राहण्यासाठी आणि व्यवस्थित कार्य करत राहण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. यासाठी आहारात, पाण्यात भिजवलेले बदाम, मनुका, तूप, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, खजूर तसेच ताज्या फळांसह मसूर, बीन्स, पनीर या पदार्थांचाही समावेश करावा. (Health Tips) यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते.
३) ग्रीन टी चे सेवन करा –
अनेकांना चहा आणि कॉफीचे एकप्रकारे व्यसन असते. मात्र यामध्ये आढळणारे कॅफिन तुमच्या मेंदूवर परिणाम करत असते. त्यामुळे चहा आणि कॉफीचे सेवन टाळून ग्री टी चे प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. दिवसभरातून २ ते ३ कप ग्रीन टी पिणे शारीरिक लाभ मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो आणि मेंदूला येणारा थकवा कमी होण्यास मदत होते.
४) व्यवस्थित झोप घ्या –
अनेकदा आपली झोप पूर्ण नसल्यामुळे आपले कामात किंवा अभ्यासात मन लागत नाही. माणसाला किमान ७ ते ८ तासांची झोप हि गरजेची आहे. यामुळे शरीरातील ऊर्जा कायम राहते आणि प्रसन्नतेमुळे मेंदूला चालना मिळते.
५) ब्रेन एक्सरसाइज –
दिवसभरातील विचार, कामाच्या गोष्टी आणि घरगुती चिंता या आपल्या मेंदूला आराम करू देत नाहीत. ज्यामुळे सतत काम करणारा मेंदू दमू लागतो आणि त्यामुळे आपण गोष्टी विसरायला लागतो. (Health Tips) हे टाळण्यासाठी दिवसभरातुन किमान २० ते ३० मिनिटे ब्रेन एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते. यासाठी फिरायला जाणे, बुद्धिबळ, क्रॉसवर्डस किंवा सुडोकूसारखे माईंड गेम खेळणे फायदेशीर ठरते.
६) मेडिटेशन (ध्यानधारणा) अभ्यास करा –
मन आणि मेंदू शांत असेल तर कोणत्याही व्याधींपासून सुटका मिळवणे कठीण नसते. त्यामुळे दररोज सकाळी मेडिटेशनचा अभ्यास नक्की करावा. यामुळे मेंदूवर येणारा ताण कमी होतो. परिणामी विसरण्याची समस्या आटोक्यात येण्यास मदत होते.
७) गरज वाटल्यास नैसर्गिक उपचार करा –
विसरण्याची समस्या दिवसागणिक वाढत असल्याचे लक्षात आल्यास नैसर्गिक उपचारांची मदत घ्या. कारण अनेक आयुर्वेदिक औषधी मानवी मेंदूच्या धी, धृती आणि स्मृती या तीन्ही शिकण्याच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यास मदतयुक्त आहेत. यामध्ये गोटू कोला, अश्वगंधा आणि बाकोपासारख्या काही विशेष औषधी गुणतत्व असणाऱ्या वनस्पतींचा समावेश आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, या औषधींचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. (Health Tips)