ह्रदयाची अशी घ्या काळजी , होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आजकाल अगदी किशोरवयीनांमध्येही हृदयविकारने मृत्यू झाल्याचे ऐकिवात येते . खरंतर आजकालची जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत आहे . वयाच्या चाळीशीनंतर शरीर प्रौढत्वाकडे वाटचाल करताना आजारपणाच्या कुरबुरी सुरु होतात . पण आता जसा काळ बदल आहे , तसे किशोरवयीन देखील हृदयविकाराने त्रस्त आहेत .

निसर्गाने मानवी शरीराला वरदान ठरतील अशा अनेक वनस्पतींनाही जन्म दिला आहे . असाच आयुर्वेदानाने महत्व सांगितलेला वृक्ष आहे पिंपळ … आज आपण आयुर्वेदाने सांगितलेला मंत्र पाहुयात .

पिंपळाची कोवळी पाने , जी अगदीच लहान (लाल ) नाहीत , आणि अगदीच ताठरलेली नाहीत अशी निवडून घ्या . १ महिन्याचे औषध बनवण्याच्या अंदाजाने १५ पाने तोडावीत . हि पाने स्वच्छ धुवून तिचे देठ आणि पुढचे टोक कट करावेत . त्यानंतर हि पाने उकळलेल्या पाण्यात उकळायचे आहेत . त्यासाठी ४ कप पाणी घ्या . आणि त्यात हि पाने तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते ४ कप पाणी १ कप पर्यंत आटते . हा काढा थंड झाल्या नंतर गाळून घ्यावा आणि काचेच्या बरणी मध्ये ठेवावा .

पिंपळकाढ्याचे तीन डोस सकाळी 8.00वा.,11.00वा., व2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत….डोस घेण्यापूर्वी पोट रिकामे असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे. हा काढा हृदयरोग झालेल्या रुग्णांनी किंवा अगदी वयाच्या पस्तिशी नंतर सुरु केला तरी हृदय नेहमी तरुण ठेवता येईल .

हा काढा आयुर्वेदिक असल्याने कोणतेही साईडइफेक्ट नाहीत आणि खर्चही नाही. पिंपळपाणाच्या गुणांविषयी गुगलवर देखील माहिती मिळते . हृदयविकार असलेल्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .

Leave a Comment