विशेष प्रतिनिधी । हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना हिवाळ्यामध्ये त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात तापमान कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाशी संबंधित समस्या वाढतात , कारण या हंगामात आपल्या शरीरात काही विशिष्ट बदल होत असतात . आणि वातावरणात देखील काही विशिष्ट बदल होत आहेत .या वातावरणामुळे अनारोग्याला आमंत्रण मिळते .
शरीराची उष्णता जपण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात . हिवाळ्यात घामही येत नाही. यामुळे, शरीरात क्षारसुद्धा जमा होतात, परिणामी रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे रक्तदाब चांगले नियंत्रित आहे, त्यांची प्रकृती देखील बिघडते आणि परिणामी त्या व्यक्तीस श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते
थंडीच्या परिणामामुळे लोक चालणे व व्यायामाऐवजी घोंगडी किंवा रजाईत जाणे पसंत करतात. यामुळे लोकांचे वजन इतर हंगामांपेक्षा अधिक वाढते.ज्यांना आधीच उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मीठ आणि पाण्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. मॉर्निंग वॉक सुरू ठेवावे.