हैद्राबाद । सध्या देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेतलेल्या काही जणांमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. आधी उत्तर प्रदेश आणि आता तेलंगणामध्ये लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे. त्यामुळं कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील निर्मल जिल्ह्यातील कुंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात 42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला 19 जानेवारी, 2020 ला सकाळी 11.30 वाजता कोरोना लस देण्यात आली. लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे लस घेतल्यानंतर 16 तासांतच आरोग्य कर्मचाऱ्यानं आपला जीव गमावला आहे.
A 42-year-old Health Care Worker passed away in early hours on Wed. He was vaccinated on Jan 19 in Nirmal district #Telangana .He developed chest pain & was brought dead to district hospital. Preliminary findings suggest that death seems to be unrelated to #COVID19 #vaccination pic.twitter.com/yYC7FfLhEt
— Anusha Puppala (@anusha_puppala) January 20, 2021
कोरोना लस घेणारे एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, “लोक कोणत्याही प्रकारची औषधं घेत असतील तर त्यांना लशीमुळे काही अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकते. शरीरात वेदना, लस घेतलेल्या शरीराच्या भागावर वेदना, सौम्य ताप असे सामान्य साइड इफेक्ट होऊ शकतात. पण 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. लशीमुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही. देशात लशीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’