हृदयद्रावक ! पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या ; दहा वर्षीय चिमुरडी झाली अनाथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुप्रीम कॉलनीमध्ये घडली आहे. जुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे जुबेर याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी बचतगट तसेच भिशी चालवत होती. कुटुंबाला हातभार लावत होती. बचतगटाच्या कर्जामुळे नजमाबी यांनी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती.
अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

त्यातच गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता पती जुबेर याने घरात एकटा असताना वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीच्या सहाय्य्यने त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. पण त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत आहे. महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment