हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशात कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अश्यातच आपल्या आप्तेष्टांना गमवण्याचं दुःख आहे. अशीच एक धक्कादायक बातमी आली आहे. झारखंड राज्यातील धनबाद जिल्यात एकाच कुटुंबातील एकापाठोपाठ आई आणि पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. आईला खांदा देणार्या पाचही मुलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रथम आईला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर चारही मुलांना आईचा संसर्ग झाला. त्यातील एका मुलाला फुफुसाचा आजार होता. उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील इतक्या जणांचा बळी जाण्याची हि पहिलीच घटना आहे. प्रथम मृत्यू झालेल्या महिलेचे वय ८८ वर्ष होते. तिने २९ जून रोजी दिल्लीत आपल्या नातीच्या लग्नासाठी हजेरी लावली होती. तेव्हाच तिला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या मृत्यूनंतर घरातील इतरांना लागण झाली. आणि एकापोठोपाठ ५ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील इतर २ सदस्याना लागण झाली आहे.
महिलेला एकूण सहा मुले आहेत. त्यातला एक मुलगा दिल्ली मध्ये राहतो. ४ जुलै रोजी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील इतर लोकांची चाचणी केली असता. ६५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . त्यांना फुफुसाचा त्रास असल्याने १० जुलै ला त्यांचा मृत्यू झाला. तीन दिवसाच्या उपचारानंतर ११ जुलै ला दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. १२ जुलै ला तिसऱ्या मुलाचा तर कॅन्सर चा आजार असलेल्या चौथ्या मुलाचा मृत्यू १६ जुलै ला झाला आणि पाचव्या मुलाचा मृत्यू १९ जुलै दरम्यान झाला. संपूर्ण कुटुंब कोरोनाने उध्वस्त होणारी हि पहिलीच घटना आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.