पुणे : राज्यात उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. विदर्भातील अकोला बुलढाणा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही प्रमाणात उष्णतेची लाट आली आहे त्यामुळे या भागात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे बुधवारी दिनांक 31 रोजी सकाळी 24 तासात चंद्रपूर येथे उच्चांकी 43.2 कमान तापमानाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात मागील तीन दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. हवामान कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्यामुळे विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट वाहत आहे यामुळे कमाल तापमानाचा व किमान तापमानात वाढ होत आहे विदर्भात उष्णतेमुळं बुलढाणा चंद्रपुर ब्रह्मपुरी या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील परभणी नांदेड शहर सोलापूर जळगाव मालेगाव या भागातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तर नाशिक येथे 17.9 अंश सेल्सिअस पर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले आहे.
देशात ओडिसातील बारीपाडा येथे सर्वाधिक 44.6 अंशांची कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील महत्वाच्या शहरातील तापमान पुढीलप्रमाणे :
मुंबई 32.8
अलिबाग -34
रत्नागिरी 32.8
डहाणू -33.1
पुणे- 36.5
जळगाव -40.5
कोल्हापूर- 35.5
महाबळेश्वर- 30.1
मालेगाव -42
नाशिक -35.8
सांगली -36.9
सातारा -37.3
सोलापूर -40.2
औरंगाबाद -39.6
परभणी -40.5
नांदेड -40
अमरावती- 42.2
बुलढाणा -41
ब्रह्मपुरी -43
चंद्रपूर -43.6
गोंदिया -42
नागपूर -41.9
वाशीम -41
वर्धा -42.2
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page