हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा वरुणराजाचे आगमन झाले असून जोरदार पाऊस पडत आहे. औरंगाबाद मध्ये देखील धुव्वाधार पाऊस पडत असून भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर.
नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार समोर आला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता . दरवाजा बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले.
दरम्यान, जळगाव मध्येही जोरदार पाऊस पडत असून चाळीसगाव-कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झाली. तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर आला असून कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला.