कराड शहरात मुसळधार पाऊस; कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने काही काळ कर्मचार्‍यांची तारांबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी कराड शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने नागरिकांची पळापळ केली. कराड व मलकापूर शहरातील गटारे नगरपालिकांनी स्वच्छ न केल्याने तुडुंब भरून वाहत होती. मान्सून येण्याअगोदरच मान्सूनपूर्व पावसाने नगरपालिकांची लक्तरे वेशीवर टांगली. तर शहरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाऊसाचे पाणी शिरल्याने काही काळासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली.

मलकापूर आणि कराड दोन्ही नगरपालिका स्वच्छतेसाठी तेंबा मिरवताना अनेकदा दिसत असतात परंतु मान्सूनपूर्व पावसाने या दोन्ही नगरपालिकांच्या मिळवण्यावर चांगले पाणी फिरवले. मलकापूर आणि कराड या शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लीतील रस्त्यावर असणारी गटारे पूर्णपणे भरून वाहत होती अवघ्या दीड ते दोन तास झालेल्या पावसाने शहरातील गटारांची आणि रस्त्यांची वाईट अवस्था झाली होती या पावसामुळे गटारे तुडुंब भरून वाहत होती आणि त्यामुळे रस्त्यावरून वाहन धारकांना ये-जा करताना मोठी कसरत करताना पाहायला मिळत होती.

कराड आणि मलकापूर दोन्ही नगरपालिकांच्या गटामधून कचऱ्याचे साम्राज्य वाहताना पाण्यामुळे पाहायला मिळाले तर अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे नाले पूर्णपणे तुडुंब भरलेली दिसून येत होती आणि ठिकाणी अनधिकृतरित्या केलेल्या बांधकामाचा फटकाही बसलेला या पावसामुळे पाहायला मिळाला शहरातील ठिकाणी अनधिकृत बांधकामे असणाऱ्या ठिकाणी बेसमेंटमध्ये तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले.