हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी सरासरी पेक्षा महाराष्ट्र जास्त पाऊस पडलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून मराठवाडामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या ठिकाणी पावसाने अक्षरशः सर्वांना झोडपले आहे. हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे. आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. आणि नागरिकांना देखील दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. परंतु या पावसामुळे या ठिकाणी नागरिकांचे घर, मालमत्ता आणि शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक मार्ग देखील पाण्याखाली गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे काही जनावरे देखील दगावलेली आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 71 मिलिमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. तसेच बीड, लातूर, धाराशिव, जालना या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर पेक्षा क्षेत्र बाधित झालेले आहे. या ठिकाणी अनेक नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे त्यांचे जनजीवन जीवन धोक्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे. यासाठी नागरिकांनी सरकारकडे मदतीची देखील मागणी केलेली आहे.
परभणीमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे दोन लाख 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दोन दिवसांमध्ये या ठिकाणी जवळपास 132 मिलिमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. या ठिकाणी पाऊस सध्या थांबला असला, तरी ढगाळ वातावरण आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अजून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हतनुर धरण देखील मोठ्या प्रमाणात भरलेले आहे. या धरणाला एकूण 41 दरवाजे आहे. आणि त्यापैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडलेले आहे. या धरणातून 97 हजार 46 30 एक वेगाने विसर्ग तापी नदीच्या क्षेत्रात होत आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक व्यक्ती त्याची गाडी घेऊन जात होता. परंतु पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. खुलताबाद या तालुक्यात हा प्रकार घडलेला आहे. धाड नदीला आलेल्या पुरामध्ये हा व्यक्ती त्याच्या गाडीसह वाहून गेलेला आहे. मोबाईलमध्ये ही घटना काहीच झालेली आहे. याप्रमाणे 45 वर्षे एक व्यक्ती देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहे. या व्यक्तीचा तपास चालू आहे. परंतु अद्यापही ती व्यक्ती सापडलेली नाही.