शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात संध्याकाळी चार वाजता आणि काही भागात रात्री सात वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. जोरदार पावसामुळे अनेक भागात पाण्याची डबके साचले होते. अर्ध्या तासात शहराचे एमजीएम वेधशाळेत 12.2 मि.मि. आणि चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेआठ वाजेपर्यंत 21.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनपूर्व पावसाने शहरात सर्व ठिकाणी हजेरी लावली आहे. बीड बायपास चिकलठाणा या भागात पावसाचा जोर अधिक होता. विविध भागामध्ये रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती. सोमवारी दुपारी अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. ताशी 19.3 वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबतच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे काही क्षणातच रस्त्यांच्या कडेला पाण्याची डबके साचन्यास सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 15 मिनिटे पाऊस झाला. यानंतर साडेसात वाजता पावसाला सुरुवात झाली हा पाऊस सर्वदूर पडला. पण शहराच्या विविध भागात जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांची धांदल उडाली होती. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू होती.

ढगाळ वातावरणामुळे आजही पाऊस पडण्याची शक्यता

आजही शहरासह जिल्ह्यात ढगाळ आणि थंड वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वातावरणातील बदल आणि पाऊसाची सुरुवात झाल्याने यंदा पेरणी लवकरच लागेल असा शेतकरी अंदाज लावत आहेत.