औरंगाबाद | दरवर्षी 15 जून पासून पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा पावसाळा आठ जुलैपासून सुरू झाला. उशिरा का होईना पण आता पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वेगाने पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
धुवाधार पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. एमजीएमच्या वेधशाळेत 19 मिनिटांमध्ये 21.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी बऱ्याच भागांमध्ये तुरळक पाऊस आला सुरुवात झाली. या सकाळच्या सत्रात पावसाची रिमझिम सुरू होती. यानंतर सायंकाळी सात वाजेनंतर जोरदार पावसाला पाऊस सुरु झाला. काही भागात वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे बऱ्याच वसाहतींमध्ये रस्त्यावर पाणी साचले होते तर अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यामुळे सिडको-हडको, पदमपुरा, बालाजी नगर, शिवशंकर कॉलनी, जय भवानी नगर, गारखेडा, वरद गणेश मंदिर परिसरातील बहुतांश घरांमध्ये पाणी शिरले होते. चिकलठाणा वेधशाळेमध्ये शुक्रवारी 8:30 वाजेपर्यंत 2.1 मिमी, गांधीली वेधशाळेत 11.7 मिमी आणि एमजीएम वेधशाळेत 25.4 मिमी पावसाची नोंद झाली.