सातारा | सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात बुधवारी पहाटे पावसाची रिमझिम सुरू होती. त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री उशिरा जोरदार बॅटिंग केली. यामुळे घरी परतणाऱ्या लोकांना पावसाचा सामना करावा लागला.
सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे आज पहाटेच पावसाने रिमझिम सुरु केली होती. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले होते. मात्र, सायंकाळी 5 नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे घरी परतणाऱ्या नोकरदार तसेच शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला.
सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर व कराड, पाटण तालुक्यात या पावसाचा मोठा फटका बसला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. तर सध्या ऊस तोडणीचा हंगाम चालू असून, पावसामुळे ऊस तोडणी बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.