हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heeramandi) बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कायम त्यांच्या भव्य दिव्य सेट आणि रोमांचकारी सिनेमांसाठी चर्चेत असतात. ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचे सेट संजय लीला भन्साळी यांच्या संकल्पनेतून उदयास आले आहेत. प्रत्येक कथानकानुसार आवश्यक असणाऱ्या सेटची उभारणी करण्यासाठी संजय लीला भन्साळी विशेष मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे त्यांनी बनवलेले सेट कायम चर्चेत येत असतात. सध्या ते आपल्या आगामी वेब सिरीज ‘हिरामंडी’मुळे चर्चेत आहेत.
‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ (Heeramandi)
गेल्या काही महिन्यांपासून संजय लीला भन्साळी हे त्यांच्या आगामी वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’मुळे विशेष चर्चेत आले आहेत. या वेबसीरिजसाठी त्यांनी अत्यंत भव्य असा सेट उभारला आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात या वेब सिरीजबाबत कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सिरीजचा टीझर आणि यातील पहिलं गाणं रिलीज झालं. यानंतर नुकताच या वेबसीरीजचा ट्रेलर समोर आला आहे. जो पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क होऊन गेले आहेत.
ट्रेलर रिलीज
‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये संजय लीला भन्साळी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला भव्य दिव्य सेट, कथानकातील रोमान्स आणि जबरदस्त ड्रामाची एक झलक पहायला मिळत आहे. ही सिरीज पाकिस्तानातील ‘हिरामंडी’ या परिसरातील कथेवर आधारलेली आहे.
त्यामुळे यामध्ये सेटवरील भव्य दिव्यता, कथेत रोमान्स आणि ड्रामा यांसह स्वातंत्र्याची लढाईदेखील पहायला मिळते. या वेबसिरीजचे कथानक वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर बेतलेले आहे. यातून एकंदरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची जीवनशैली आणि देशाच्या स्वातंत्र्यादरम्यानचा त्यांचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.
डायलॉगने वेधलं लक्ष
या वेब सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात, ‘सिर्फ घुंघरू पहन लेने से औरत तवायफ नही होती… दिन के और रात के सारे हुनर सिखने पडते है…’ या डायलॉगने होते. हा डायलॉग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Heeramandi)
यामध्ये मल्लिकाजान ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची प्रमुख दाखवली आहे. जी अख्ख्या हिरामंडीवर राज करतेय. पण तिच्या जुन्या शत्रूची मुलगी फरीदानच्या येण्याने तिच्या राजवटीवर गदा येते. यापुढे काय होणार? हे पाहण्यासाठी सिनेमा पहा.
तगडी स्टारकास्ट
‘हीरामंडी’ या सिरीजमध्ये अत्यंत तगडी स्टारकास्ट पहायला मिळेल. या सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे. येत्या १ मे २०२४ रोजी ‘हीरमंडी : डायमंड बझार’ (Heeramandi) ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.