राजस्थान | दुचाकीस्वारांना अपघातामध्ये डोक्याला इजा होऊ नये म्हणून हेल्मेटचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हेल्मेट घालने सक्तीचे केले आहे. महाराष्ट्रामध्ये हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. त्यानंतर आता राजस्थान सरकारनेही हेल्मेट सक्ती केली आहे. नवीन गाडी विकत घेतानाच यापुढे हेल्मेट मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचारियावास यांनी याबाबत माहिती दिली.
परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, राज्यसरकार हे रस्ते सुरक्षेसाठी कटिबध्द आहे. जखमी आणि मृतांची संख्या रस्ते अपघातात कमी करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून पैसे वाचवण्यासाठी अनेक लोक कच्चे अथवा खराब हेल्मेट घालतात. त्यामुळे गरजे इतके संरक्षण मिळत नाही. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार गाडी घेतानाच उत्तम क्वालिटीचेच हेल्मेट ग्राहकाला देण्यात येणार आहेत.
भारतात हेल्मेटचा गुणवत्ता सुनिश्चित उत्पादकांना भारतीय मानक ब्युरोचे (BIS) मानके पाळणे बंधनकारक असणार आहेत. असे असतानाही आजही देशात मोठ्या प्रमाणात हेल्मेट साधारणपणे बनवले जातात. रस्ते अपघाताच्या परिस्थिती दरम्यान भारतात हेल्मेटचा गुणवत्ता देशाच्या न्यायालयात पोहचली आहे. अलीकडेच, दिली उच्च न्यायालयाने BIS ला हेल्मेटचा निर्मिती व विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे साधारण हेल्मेटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.